Satish Kulkarni on Clubhouse

Updated: Oct 6, 2023
Satish Kulkarni Clubhouse
53 Followers
61 Following
@satish_kulkarni Username

Bio

नमस्कार 🙏🏼,

माझ्या प्रोफाईलवर तुमचे स्वागत आहे. कधी काळी स्वतःबद्दल कुणालाच न सांगणारा आज बऱ्यापैकी व्यक्त होतोय. असो.

मोजक्या शब्दात भावनांना वाट मोकळी करून द्यायला मला आवडतं. त्यातही गझले पेक्षा वृत्तात कविता करण्यावर माझा जोर असतो.

पादाकुलक मात्रा वृत्तातील माझा एक प्रयत्न.

आज दुपारी पुन्हा एकदा
नाही झाले मनाजोगते
श्रींची इच्छा असेल काही
मान्य कराया धैर्य लागते

उंच मनोरा तुझाच राजा
आणाभाका ठरल्या खोट्या
कुत्सित हसले मनात कोणी
मोठ्या मोठ्या जिरल्या कोट्या

करण्या सांत्वन उठला जो तो
कर्तव्य ज्ञान झाला देता
दूर क्षितिजी मित्र बुडूदे
पहिला मान खातो नेता

जगावेगळा नाही मी पण
हताश झालो क्षणात एका
पुन्हा नव्याने बळे बळेच
ऐकू आल्या आणा भाका

सतिश कुलकर्णी

Member of

More Clubhouse users