गप्पा टप्पा” हा दिलखुलास कविता आणि सुश्राव्य गाणी ठासून भरलेला सुंदर कार्यक्रम दि. ४ एप्रिल २०१५ रोजी, सुदर्शन रंगमंच, पुणे येथून सुरु झाला. अगदी सोप्या पण मनाला भिडण्या-या कविता आणी लगेच लक्षात राहणारी, सहज गुणगुणता येतील अशी गाणी देणारा हा अनोखा प्रयोग उभ्या महाराष्ट्रांनी अगदी डोक्यावर घेतला. एका वर्षा आतच पुणे, गोवा, मुंबई, ठाणे, कणकवली, महाड अश्या अनेक ठिकाणी रसिकांचे प्रेम मिळवत चौतीस प्रयोग पूर्ण झाले.