Men's Right
Food
Spritual
"आई म्हणजे काय?"
आई नसते नुसती जन्मदाती
नऊ महिन्यांच ओझ पेलणारी
आई असते निर्मळ झरा
प्रेमाचा नी मायेचा || १ ||
आई नसते नुसती सांभाळणारी
मी तुला लहानाचे मोठे केले बोलणारी
आई असते त्यागाचे आदर्श
मुलाच्या उज्वल भविष्यासाठी, जीव सांडणारी || २ ||
आई नसते मुला तोडणारी
बापाच्या छत्रापासून चोरणारी
आई असते वात्सल्यमूर्ती
माया आणि कर्तव्य यात गफलत न करणारी || ३ ||
आई नसते नुसती नावापुरती आई
कर्तव्याला अनभिज्ञ आणि हक्काला उत्तराई
आई असते मुलाचे भविष्य बघणारी
आपला हक्क सोडून, त्याला घडवणारी || ४ ||
आई नसते नुसती स्त्री, माता, जननी, आणि माय
साहित्यातील तिच्या गुणवर्णनाला मग अर्थ तरी काय
आई असते त्याग दुर्गुणांचा
आई असते झरा सद्गुणांचा || ५ ||
आई नसते नुसती एक स्त्री एक अबला
आपलाच मुल चोरणारी धूर्त बाला
आई असतो पुरुष पण, जिथे सद्गुणांची साऊली
नाहीतर उगीच का ज्ञानेश्वरांना म्हटल असत माऊली || ६ ||
if the data has not been changed, no new rows will appear.
Day | Followers | Gain | % Gain |
---|---|---|---|
October 21, 2023 | 111 | +1 | +1.0% |
October 17, 2022 | 110 | -2 | -1.8% |
June 06, 2022 | 112 | -1 | -0.9% |