पोल्ट्रीयोद्धा महाराष्ट्र on Clubhouse

पोल्ट्रीयोद्धा महाराष्ट्र Clubhouse
6 Members
Updated: Mar 16, 2024

Description

पोल्ट्री योद्धा महाराष्ट्र !! महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा राज्यस्तरीय वचननामा !!

    पोल्ट्री योद्धा ही संघटना प्रथमतः रायगड जिल्ह्यात अस्तित्वात आली व त्यानंतर ‌‌ अध्यक्ष अनिलजी खामकर साहेब व मॅनेजिंग डायरेक्टर विलासजी साळवी साहेब हे महाराष्ट्राची धुरा सांभाळत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून रायगड जिल्ह्याची धुरा खजिनदार मनोज दासगावकर साहेब व सेक्रेटरी दीपक पाटील साहेब सांभाळीत आहेत म्हणूनच पोल्ट्री योद्धा या नावाने एक- एक जिल्हा एकत्र करण्यास सुरुवात केली आता मजल दर मजल करीत आपली संघटना महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात कार्यरथ आहे.  पोल्ट्री  योद्धा संघटनेचे काम योग्य पद्धतीने चालू आहे. हे सर्व करीत असताना होणारा खर्च हा आम्ही वैयक्तिक रित्या करीत आहोत रायगड संघटने मधील देखील पैसा आम्ही या कार्यासाठी वापरलेला नाही. संघटनेचे महत्वाचे उद्देश्य महाराष्ट्र शासन व केंद्रीय शासन यांचे पोल्ट्री शेतकरी व्यवसायिक बाबत असणारी संकुचित ध्येयधोरणे बदलून वास्तव पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्याला आवश्यक असणारे शासन निर्णय तयार करून घेणे, पोल्ट्री व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय असताना पोल्ट्री वरील ग्रामपंचायत कर सरकारने माफ करावा अथवा कमी दराने ग्रामपंचायत कर बसवावा, लाईट बिल शेतीपूरक व्यवसाय या दराने करून घेणे, हमीभाव, त्याचप्रमाणे जिवंत पक्षी व पोल्ट्री शेड यासाठी विमा संरक्षण,व कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सिस्टीम मधील कंपन्या फार्मर सोबत अन्याय करत आहेत व जाचक करारनामा करतात त्या जाचक अटी मोडून काढणे व फार्मर ला योग्य असा ग्रोईंग चार्जेस मोबदला देणे हे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि वरील सर्व बाबींचा अतिशय बारकाईने अभ्यास करून या बाबी कागदावरती उतरवून सरकार दरबारी सादर केल्या गेल्या आहेत
संघटना बांधत असताना पोल्ट्री योद्धा या संघटनेने कोणाकडे ही एक रुपया सुद्धा आजपर्यंत घेतलेला नाही आपण राज्यस्तरीय कोणतीही नोंदणी वर्गणी किंवा सभासद वर्गणी जमा करीत नाही फक्त जिल्हास्तरीय  सभासद वर्गणी व नोंदणी वर्गणी जमा केली जाते आणि त्यातून जमा होणारे पैसे हे जिल्हा कमिटीकडेच राहतात व त्या कमिटी कडूनच त्या पैशाचा हिशोब सदस्यांना दिला जातो  महाराष्ट्र पोल्ट्री योद्धाने आज पर्यंत कोणतेही पैसे जमा केलेले नाही  पोल्ट्री योद्धा संघटनेतील सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी कोणत्याही जिल्हा मेळाव्याला येताना ते संघटनेच्या पैशांमधून खर्च न करता वैयक्तिक खर्च करून मेळाव्यासाठी उपस्थित राहतात आणि हीच पद्धत प्रत्येक जिल्ह्याने अवलंबावी ही विनंती
इतर संघटनेमार्फत  जर कोणी सभासद वर्गणी किंवा नोंदणी वर्गणी जमा करत असेल तर त्यातून जमा होणारे पैसे वैयक्तिक त्यांच्याकडे जमा झाले आहेत त्याचा पोल्ट्री योद्धा संघटनेसोबत काही संबंध नाही याची कृपया सर्व पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी
हि नम्र विनंती🙏🙏🙏
    आपले स्नेहांकित
अनिलजी खामकर
विलासजी साळवी

Last 30 Records

Day Members Gain % Gain
March 16, 2024 6 0 0.0%
January 25, 2024 6 0 0.0%
December 12, 2023 6 0 0.0%
November 03, 2023 6 0 0.0%
October 03, 2023 6 0 0.0%
September 04, 2023 6 0 0.0%

Charts

Some Club Members

More Clubs